हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………। मि त्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच , फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि केली मा...