हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।
मित्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच , फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि केली मात्र काहींनी या संकटाना , आलेल्या अपयशांना हरवलं व अस काही करून दाखवलं कि जगात फारच कमी लोग ते करू शकतात . या आणि अश्याच लोकांची माहिती आपण या सदरात करणार आहोत या लोकांनी आभाळाला ठेंगण केल व दाखवून दिल कि प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात विश्वास आहे ,पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे , आम्ही सयाद्री सारखे ताट आहोत जाऊन सांगा वादळांना त्यांची आमच्याशी गाठ आहे . शेवटी म्हणतात हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है, माझ्या दृष्टीने बाजीकर ठरलेली हि काही लोकं , ज्यामुळे तुम्हाला नुसती जगण्याचीच नाहीतर, जगत असताना काहीतरी करून दाखवण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल .
अंबानी, बिर्ला, मित्तल, गोयंका
यांच्यासारख्या उद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून
त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु असे हजारो तरूण उद्योजक
आहेत ज्यांनी कमी वयात अनेक समस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ
राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप मिळवली
आहे. आजच्या वर्धापन अंकात आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच चार
तरूण उद्योजकांची. त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या
महत्त्वाकांक्षेची. प्रतिक मुकणेकाही
वर्षापूर्वी पारंपारिक शिक्षण पदवी मिळाली की, एखाद्या खाजगी कंपनीत
चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न
करणे हेच बहुसंख्य तरूणांचे उद्दिष्ट असायचे. परंतु आता मात्र परिस्थिती
तशी राहिलेली नाही. भारत देश हा जगात मोठया प्रमाणात युवावर्ग असलेला देश
आहे. आपल्या देशातील लोकसंख्येपैकी सुमारे ५० कोटी लोक हे ३० वर्षे
वयोगटाखालील आहेत. देशातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून
नोकरी करण्यासाठी विकसित शहरांमध्ये स्थलांतर करतात. परंतु प्रत्येकाला
योग्य संधी मिळते असे नाही. मात्र, संधीचा अभाव असला तरी पऊल मागे न टाकता
आजचा तरूणवर्ग परिस्थितीला सामोरे जाऊन स्वत:च्या कर्तुत्वाने काहीतरी नवीन
करू पाहतो. पारंपरिक करिअरच्या पुढे जाऊन, झापडबंद पर्यायां पलीकडचा विचार
करून स्वत:च्या मेहनतीने उद्योजक बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे.
डिझाइनिंग,
क्रिएटिव्ह वर्क, अॅनिमेशन, फोटोग्राफी, पेंटींग, शेअर बाजाराचे ज्ञान
अशा विविध गुणांनी संपन्न. त्याने कोणतेही क्षेत्र निवडले असते तरी त्यात
सहज मोठे यश संपादीत करण्याची क्षमता त्याच्यात होती. परंतु ‘बी वीत द चेंज
टू बी द बेस्ट इन द फिल्ड’ मानणाऱ्या केविनने काळाची पाऊले ओळखली. इतर
क्षेत्रांच्या तुलनेत जाहिरात क्षेत्र मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे.
आपल्याकडे कल्पकता आहे आणि आपला ज्या गोष्टीत हातखंडा आहे, तेच आपण केले
पाहिजे असे त्याला वाटत होते. महाविद्यालयात शिकत असताना, कॉलेजमधील युथ
फेस्टिवलसाठी जेव्हा त्याने पहिल्यांदा लोगो डिझाइन केला तेव्हाच त्याने
स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू करण्याचे स्वप्न बाळगले होते.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर
केविनने कल्पनेला आकार देण्याचे ठरवले. परंतु कंपनी सुरू कशी करायची, नाव
काय द्यायचे, कायदेशीर बाबी कशा पूर्ण करायच्या, पैसे कसे उभे करायचे,
विशेष म्हणजे कामे कशी मिळवायची असे अनेक प्रश्न त्याच्या डोळय़ासमोर होते.
परंतु सर्व अडचणींना तोंड देत केवळ ४ महिन्यांत ‘अनबॉक्स मीडिया’ या
नावाने त्याची स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू केली.
जी उत्पादने बाजारपेठेत नवीन आली आहेत
किंवा ज्या उत्पादनांना बाजारपेढेत आपली नवीन प्रतिमा निर्माण करायची आहे,
मग ती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन, किंवा लोगो फॉर्मटमध्ये असो, अशा
उत्पादनांना नवीन प्रकारे रिवँप करण्यासाठी ब्राँडिंग आणि कम्युनिकेशन
सोल्युशन्स उपलब्ध करून देण्याचे काम अनबॉक्स मीडियाने सुरू केले आहे.
सध्या ‘अनबॉक्स मीडिया’ लघु व मध्यम
उद्योग, उत्पादन कंपनी, वित्तिय संस्था, खाजगी बँका, तसेच औषध उत्पादने आदी
कंपन्यांना आपली सुविधा पुरवत आहे.
गुंतवणूक: 2 लाख रूपये
आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहणे
ही सोपी गोष्ट नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर त्यासाठी गरज असते
ती योग्य व्यूहरचनेची आणि अथक परिश्रमाची. अशीच काहीशी गोष्ट आहे २३
वर्षीय संकेत भटची. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धाडसी वृत्तीच्या
संकेतला वयाच्या १४ व्या वर्षापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती.
घाटकोपर येथील डी. जे. दोशी गुरूकुल हायस्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण
केले. इव्हेंट मॅनेजमेंटची आवड असणाऱ्या संकेतने शालेय शिक्षण पूर्ण
झाल्यावर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन इव्हेंट
मॅनेजमेंटचा अनुभव प्राप्त केला आणि वयाच्या १९ व्या वर्षी ‘‘मोक्श’’ ही
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. परंतु त्याच्यासाठी हा मार्ग सोपा
नव्हता. जेव्हा तो आपल्या कंपनीबद्दल इतरांना सांगायचा आणि काम मिळविण्याचा
प्रयत्न करायचा तेव्हा सगळयांनी त्याला वेडयात काढले. ‘‘तू अजून खूप लहान
आहेस. तुला हे जमणार नाही, तुझ्याकडे कुठलाही अनुभव नाही, त्यामुळे आम्ही
तुला कोणतेही काम देऊ शकत नाही’’ असे सांगून त्याला जायला सांगायचे.
कोणतेही महाविद्यालय अथवा खाजगी कंपनी काम देत नाही म्हणून त्याने
फ्रिलान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. परंतु फ्रिलान्सिंगमध्ये
काहीही उत्पन्न मिळत नव्हते. नोकरी करायची नाही, पण मग करायचे काय, असा
प्रश्न त्याला पडला. अशातच त्याच्या लक्षात आले की, इव्हेंट मॅनेजमेंट
कंपन्यांना प्रसिध्दीसाठी मीडियाची गरज असतेच, जर इव्हेंटला मीडिया कव्हरेज
मिळाले तर आपण लोकांना आकर्षित करू शकतो. शहरात अनेक ठिकाणी लहान मोठे
कार्यक्रम होत असतात. मात्र, त्यांना प्रसिध्दी मिळत नाही. नामवंत कंपन्या
विपणनसाठी लाखो रूपये खर्च करतात, पण ज्या कार्यक्रमांचे आणि कंपन्यांचे
पब्लिसिटी बजेट केवळ २ ते ३ हजार रूपये आहे, त्यांचे काय? जर आपल्या
स्वत:चेच मीडिया पोर्टल असले, तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल, असे त्याला
वाटले आणि यातूनच संकेतने सन २०११ मध्ये ऑनलाईन मिडियामध्ये प्रवेश
करण्याचा निर्णय घेतला. ‘मोक्श-व्ही रन द शो’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमांना व इतर लहान-मोठया कार्यक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी
त्याने ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले. मीडिया नेटवर्क
सुरू करण्यासाठी संकेत आणि त्याच्या चमूला २ वर्षे लागली आणि
नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दीड वर्षे मेहनत घ्यावी लागली.
‘मोक्श-व्ही रन द शो’ ही कंपनी यशस्वीरित्या
मीडिया-इव्हेंट-मनोरंजन-कम्युनि केशन या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘मोक्श’ ने’
कॉपरेरेट क्षेत्रात आज चांगले नाव कमविले असून ब्रांड, उत्पादने, कॉपरेरेट
लाँच, रोड शो, मॉल प्रमोशन, कार्यशाळा, वार्षिक संमेलन, महाविद्यालयीन
कार्यक्रम, प्रदर्शने अशा विविध इव्हेंटची कामे घेत आहे.
‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’
मुळ व्यावसायाला योग्य चालना मिळावी
यासाठी सुरू करण्यात आलेली ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ केवळ मोक्श इव्हेंट
पब्लिसिटीसाठी मर्यादित राहिलेली नाही. कॉलेजला जाणारे
विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि तरूण वर्गाला अनुसरून मुंबईकरांना हवी-हवीशी
मुंबईतील महाविद्यालयांची चटपटीत-मसालेदार लाईफस्टाईलची माहीती पुरवत आहे.
महाविद्यालये तसेच इतर ठिकाणी होणारे सर्व लहान मोठे उपक्रम कव्हर केले
जातात. इतकेच नव्हे, तर मुंबईकरांना आपली मत मांडण्याची संधी देखील
’ढिंकचॅक’ उपलब्ध करून देत आहे. मग आपले मत राजकारणाबाबत असो किंवा प्रेमी
युगलांबद्दल, ते तुम्ही बिंधास्त पणे मांडू शकता.
‘ढिंकचॅक मुंबईने ब्लॅकबेरी मोबाईल चॅनल
सुध्दा सुरू केला आहे. ज्याद्वारे ब्लॅकबेरी असलेल्या मुंबईकरांना
मुंबईमधील घडामोडींची माहिती दिली जाते. त्यासाठी ब्लॅकबेरी असलेल्यांना
‘274ए59बीसी’ या पीनवर क्लिक करावे लागेल.
दर महिन्याला मुंबई, अहमदाबाद, पुणे, नवी
दिल्ली, बंगलूरू या शहरातील सुमारे ४० हजार लोक या संकेतस्थळाला भेट देतात.
विशेष म्हणजे, मुंबईतील सेंट झेविअर्स, के.सी, अजुंमन-ए-इस्लाम, नॅशनल
कॉलेल, विद्यालंकार, महेश टुटोरिअल अशी २५ पेक्षा अधिक महाविद्यालये सलग्न
झाली आहेत.
गुंतवणूक: संकेतने इव्हेंट मॅनेजमेंट
कंपनी सुरू करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. परंतु ‘ढिंकचॅक मुंबई
डॉट कॉम‘ सुरू करण्यासाठी केवळ १५ हजार रूपयांची गुंतवणूक केली होती.
उत्पन्न: नेट असेट: ५ लाख रूपये
कंपनी टर्नओवर: ४५ लाख
मीडिया क्षेत्राचे आकर्षण कॉलेजमध्ये
असल्यापासूनच असलेला मीहिर हा ठाणे शहरातील रहिवासी आहे. रूईया
महाविद्यालयातून जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर एमबीए
करण्यासाठी मीहिर बंगलूरूला गेला. एमबीएचे शिक्षण घेत असल्यामुळे
व्यावसायाशी निगडीत विविध कार्यशाळेत सहभागी होणे हे त्यांच्यासाठी
बंधनकारक होते. त्याच दरम्यान ‘फिक्की ’या संस्थेने हैदराबादमध्ये एक
सेमिनार आयोजित केला होता, ज्यात मल्याळम चित्रपट सृष्टीतील
दिग्दर्शक-निर्माते सुरेश बाबू हे देखील वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते.
याच सेमिनारमध्ये मीहिर आणि त्याचा बॅचमेट संदिप वेंकट हे सहभागी झाले.
‘‘चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी प्लॅटफॉर्म उपलब्ध
होणे आवश्यक असून तसे झाल्यास त्याचा सिनेसृष्टीला खूप फायदा होऊ शकतो’’,
असे वक्तव्य सुरेश बाबू यांनी त्या सेमिनारमध्ये केले होत. त्यांच्या त्या
वक्तव्याचा प्रभाव मीहिर आणि व्यंकट यांच्यावर पडला आणि त्यांनी
त्यादृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी संशोधन करण्यास सुरूवात
केली.
संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात
आले की जवळपास १७ दशलक्ष भारतीय नागरिक परदेशात राहतात. परदेशात स्थानिक
भाषेतील चित्रपटांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. आपल्या मूळ भाषेतील चित्रपट
पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळाम, कन्नड
आणि गुजराथी अशा विविध भाषेतील लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया,
सिंगापूर, अरब, दुबई, कॅनडा या देशांमध्ये स्थित आहेत. परंतु त्यांना
आपल्या मुळ भाषेतील चित्रपट ते स्थित असलेल्या देशांमध्ये प्रदर्शीत होत
नसल्यामुळे बघायला मिळत नाहीत. हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते भरभक्कम पैसा
असल्यामुळे जगभर चित्रपट प्रदर्शीत करतात. परंतु इतर भाषेतील निर्मात्यांना
उत्कृष्ट सिनेमे सुध्दा ‘लो बजेट’ मुळे परदेशात प्रदर्शित करता येत नाहीत.
परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक भाषेतील चित्रपट ज्यावेळी
भारतात प्रदर्शित होतात त्याचवेळी उच्च दर्जाच्या चित्रफितीत बघायला मिळावे
व स्थानिक निर्मात्यांना कमी खर्चात तो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत
पोहचवता यावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे असा मीहिर आणि संदिपला
वाटले आणि त्यातूनच निर्माण झाले ते ‘व्हच्र्युअल थिएटर’.
सन २०१२ मध्ये ‘व्हच्र्युअल थिएटर’ने
तामिळ भाषेतील ‘मालाय पोझुदिन मायाकथिलयी’ हा स्थानिक चित्रपट जेव्हा
चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त्याचवेळी तो ऑनलाईन रिलिज केला. अमेरिकेत
जेव्हा एखादा भारतीय चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा साध्यातील साध्या
सिनेगृहात चित्रपट पाहण्यासाठी किमान २० डॉलर (१२०० रूपये) मोजावे लागतात.
परंतु ‘व्हच्र्युअल थिएटर’ने आपला पहिला चित्रपट केवळ केवळ ४.१ डॉलर (२४०
रूपये) या दरावर रिलिज केला. विशेष म्हणजे त्याला प्रतिसाद देखील चांगला
मिळाला. केवळ ३ दिवसांत परदेशातील ८५ लोकांनी ‘व्हच्र्युअल थिएटर’ चित्रपट
पाहिला असून ५०० जण सदस्यही झाले आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात
‘कलाकार’ हा चित्रपट ऑनलाईवर रिलिज होणार आहे. तर मे महिन्यापर्यंत ४ मराठी
चित्रपट व एक गुजराथी चित्रपट रिलिज केला जाणार आहे. अर्थात ऑनलाईन रिलिज
झालेले चित्रपट हे केवळ परदेशात राहणाऱ्या नागरिकांनाच पाहता येतील.
स्थानिक निर्मात्यांना या नवीन
प्लॅटफॉर्मबाबत आकर्षित करणे तसेच रिलिज होणाऱ्या चित्रपटांची प्रिंट
उत्कृष्ट दर्जाची असेल व कोणत्याही प्रकारची पायरसी होणार नाही हे पटवून
देणे व आंतरराष्ट्रीय स्तरावर विपनण करणे हे मीहिर आणि त्याच्या टीमसमोर
मोठे आव्हान आहे. भविष्यात ‘व्हच्र्युअल थिएटर’ कंटेन्ट लायब्ररी व म्युझिक
स्ट्रिमिंग देखील उपलब्ध करून देणार आहेत.
गुंतवणूक: ४.५ लाख रूपये
चित्रपट बघणे आणि शॉर्ट फिल्म बनवणे हेच
त्याच्यासाठी सर्वकाही आहे. अगदी लहान वयापासूनच त्याला सिनेसृष्टीचे वेगळे
आकर्षण होते. जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएट झालेल्या रिधेशने ज्युनिअर
कॉलेजमध्ये असल्यापासूनच फिल्म मेकिंगमध्ये रस घेतला व वयाच्या १७व्या
वर्षी पहिला लघुपट बनवला. महाविद्यालयात असताना विविध फिल्म फेस्टिवलमध्ये
सहभागी झाल्यावर आणि जवळपास २५ शॉर्ट फिल्म बनविल्यावर रिधेशच्या लक्षात
आले की, भारतात ‘फिचर फिल्म’ तयार करण्यासाठी योग्य ज्ञान, अनुभव, टीम आणि
पैशांची अत्यंत गरज आहे.
भारतीय फिल्म इंडस्ट्री कडे बघता, त्यामध्ये असलेली विसंगती लक्षात घेता,
जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो, तर आपले एकही ध्येय पूर्ण होणार नसल्याचे
त्याला जाणवले आणि त्याने स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला व
त्यातूनच नावारूपाला आली ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ कंपनी.
महाविद्यालयात असताना फिल्म मेकिंगमध्ये
मिळालेल्या पारितोषिकाचे पैसे (सुमारे ७५ हजार ) आणि एका नातेवाईकांकडून
घेण्यात आलेल्या १८० चौरस फुटाच्या खोलीत (जी त्याने दोन वर्षे वापरली)
रिधेशने आपला प्रवास सुरू केला. त्याचा उद्देश स्पष्ट होता. क्लायंटसाठी
लघुपट बनवायचे आणि पैसे मिळवून स्वत:च्या फिल्म्स बनवायच्या व त्यासोबत
व्यावसायिक अनुभव प्राप्त करून एक चांगली टीम बनवायची.
सुरूवातीला रितेश आणि त्याच्या टीमने
सामाजिक संस्थांसाठी फिल्म्स बनवण्यास सुरूवात केली. बघता बघता त्यांनी
कॉपरेरेट क्षेत्र गाठण्यास देखील सुरूवात केली. आज ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’
ही कंपनी आयसीआयसीआय, टाटा, इन्टेलकॅप, क्राफ्टफुड्स, डी लिंक अशा
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठी लघुपट बनवत आहे. तसेच त्यांनी
स्वत:चे ४ लघुपट तयार केले आहेत.
रितेशने तयार केलेल्या लघुपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेकवेळा नामांकन तसेच पुरस्कार मिळाले आहेत.
‘‘स्विंडल्ड’’: या फिल्मला गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते.
‘‘सततम’’: साबुदान्यापासून गणपती बनवणारा
गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विजेता मोहन कुमारच्या जिवनावर आधारीत ही फिल्म
भारत सरकारद्वारे सांस्कृतीक विभागासाठी घेण्यात आली आहे.
‘‘द लास्ट फाईव्ह मिनिट्स’’: ही फिल्म बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोरियन भाषेत बनविण्यात आली होती.
केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ‘वाईसगाय
एन्टरटेन्मेंट’ने मोठे यश संपादन केले आहे. १८० चौरस फुटाच्या खोलीमधून
सुरूवात केलेल्या रिधेशने ९०० चौरस फुटांचे ऑफिस घेतले आहे.
आगामी काळात भारतात ‘‘डार्क क्नाईट ट्रिलॉजी’’ सारखा चित्रपट बनविण्याचे त्याचे स्वप्न आहे.
पुरस्कार
सन २००८ मध्ये ‘अद्वितिया’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला
सन २००९ मध्ये ‘स्वकृष’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला
गुंतवणूक: ७५ हजार रूप्ये
एस्टीमेटेट टर्नओव्हर ( सन २०१२-१२)
सुमोर १ कोटी २० लाख
प्रतिकूल
परिस्थितीवर मात करून एमपीएससी च्या परीक्षेत प्रावीण्य मिळविणा-या रमेश
घोलपसारख्या तरुणाची कहाणी ही परीक्षा देणा-या तरुणांसाठी नक्कीच
प्रेरणादायी ठरू शकेल. टीम युवा
`इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण आपल्या
सर्वांच्याच परिचयाची आहे. नेटाने प्रयत्न केल्यास क्षेत्र कुठलेही असो यश
हमखास मिळतेच. हाच अर्थ ही म्हण स्पष्ट करते. आपल्या अवतीभोवती विविध
क्षेत्रातील अशी अनेक मंडळी यश मिळवण्यासाठी सातत्याने धडपडत असतात,
प्रयत्न करीत असतात. त्यांची ही झुंज एकाकी असली, तरी मिळालेल्या यशानंतर
मात्र ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण रमेश
घोलप या तरूणाने सर्वांसमोर ठेवले आहे. ज्याच्या यशामुळे महाराष्ट्रातल्या
हजारो-लाखो तरूणांना नक्कीच प्रेरणा मिळू शकेल.
नुकत्याच
लागलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग
(एमपीएससी/ युपीएससी) परीक्षेच्या निकालांमध्ये रमेशने एकाचवेळी दुहेरी यश
संपादन केले आहे. `एमपीएससी’मध्ये प्रथम क्रमांक पटकावितानाच त्याने
`युपीएससी’त 288 वा रॅंक मिळवल्याने सर्वच स्तरातून या तरूणाचे कौतुक होत
आहे.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील महोगाव या
छोटय़ाश्या खेडय़ातल्या रमेश घोलपने आपल्या कतृत्वाच्या जोरावर साऱया
राज्याचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. छोटय़ाश्या खेडय़ातला हा तरूण आता
डेप्युटी चीफ एक्झ्युक्युटीव्ह ऑफीसर/ ब्लॉक डेव्हलपमेण्ट ऑफीसर (अप्पर
ग्रेड) या मोठय़ा हुद्दय़ावर आसनस्थ होऊन आपल्या विभागाचा कारभार हाकणार
असला, तरी त्याचा आजपर्यंतचा प्रवास मात्र अत्यंत खडतर असाच होता.
बारावीमध्ये 89 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत पुढील भविष्याची स्वप्न
रंगवत असतानाच रमेशच्या वडीलांचे दुर्दैवी निधन झाले. त्याची आई घरोघरी
जाऊन बांगडय़ा विकून व भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा डोलारा कसाबसा
सांभाळीत असताना त्यांना हातभार लावण्याच्या उद्देशाने रमेशने नाईलाजाने
डी. एड ची पदविका मिळवली व सोलापूर येथील पालिकेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी
पत्कारली.
बारावीनंतर नोकरीची वाट धरली असली, तरी
कसे का होईना पण ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे असा ध्यासही रमेशने घेतला होता.
त्यासाठी पुणे येथील यशवंतराव मुक्त विदय़ापिठाचा त्याला आधार मिळाला. येथून
बी.ए ची पदवी घेत रमेशच्या आकाक्षांना अधिक धुमारे फुटू लागले आणि
यापेक्षाही उंच उडी मारत यशाच्या क्षितीजाला स्पर्श करण्याचा मोह रमेशला
होऊ लागला. गावात असताना लहानसे सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमात
रमेशचा नेहमीचाच सहभाग असायचा. त्यानंतर डी.एड च्या विदय़ार्थी संघटनेचा
सेक्रेटरी आणि नेहरू युवा मंडळाचे काम करताना सामाजिक कार्याची आपसूकच
त्याच्यात आवड निर्माण झाली. `आय.ए.एस’ ऑफीसर होऊन शासकीय नोकरीच्या आधारे
ही आवड जपत समाजाचे भले करायचा विचारही तेव्हाच त्याच्या मनात घोळू लागला.
अन् सुरू झाली अथक परिश्रमाची गाथा. `युपीएससी’च्या पहिल्या प्रयत्नात अपयश
हाती आले, तरीही न डगमगता त्याने माग्रात्मकण करणे सुरूच ठेवले. घरच्या
गरीबीशी झुंज देत कुठल्याही स्पेशल क्लासच्या आडमार्गाने न जाता दिवसातील
सोळा-सोळा तास अभ्यास करीत या पठ्ठय़ाने दुसऱया प्रयत्नात थेट महराष्ट्र
लोकसेवा आयोग परीक्षेत प्रथम क्रमांकाला गवसणी घालत केंद्रीय लोकसेवा
आयोगातही बाजी मारली.
सर्व
साधने हाताशी असूनही कुठले ध्येय समोर नसलेल्या वा केवळ खाजगी नोकरीत
गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची आस धरणाऱया महाराष्ट्रातील बहुसंख्य तरूणांनी
रमेश घोलपचा आदर्श समोर ठेवला, तर महाराष्ट्राचाही थोडाबहुत चेहरा
युपीएससीच्या मेरीट लिस्टवर चमकू शकेल.
बहिरेपणाचा अनुभव आयुष्यात एक सेकंदही न
घेतलेल्या आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना कळतही नाही की बहिऱ्या
माणसांसाठी रोजची साधी कामे करणे किती कठीण असू शकते. उच्च शिक्षण
घेतलेल्या ‘ध्रुव लाक्रा’ने अशाच व्यक्तींना घेऊन स्वतंत्र व्यवसाय करण्याची नामी युक्ती या प्रसंगातून शोधली आणि त्यात यश मिळविले. अमेय अनंत बेनारे
दररोज प्रवास
करताना आपल्याला विविध प्रसंगी अपंग व्यक्ती दिसतात. मग ते कुठेही असोत
अगदी सार्वजनिक ठिकाणांपासून ते मोठाल्या बंगल्यांमध्ये, त्यांना पाहून मन
थोडेफार हळवे होतेच. अगदी मुंबईसारख्या ठिकाणी भयानक चित्रविचित्र अपंगत्व
आलेल्या भिकाऱ्यांचे दृश्य पाहून आपली संवेदना बऱ्यापैकी बोथट झालेली असली
तरीही. अशात आपल्या आसपास असणाऱ्या हजारो अदृश्य अपंगत्व आलेल्या लोकांची
आपल्याला सुतराम कल्पनाही नसते. हे अपंगत्व म्हणजे बहिरेपणा.
भारतातील
लाखो लोकं विविध प्रकारच्या बहिरेपणाचे शिकार आहेत. वरवर दिसत नसल्याने
त्याच्यातील या अत्यंत मूलभूत कमतरतेकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. अशा
लोकांना समाजाची सहानभूती तर मिळत नाहीच. वरून बऱ्याचशा हालअपेष्टांना तोंड
द्यावे लागते. मानहानीकारक वागणुकीला सामोरे जावे लागते. बहिरेपणाचा अनुभव
आयुष्यात एक सेकंदही न घेतलेल्या आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना कळतही
नाही की बहिऱ्या माणसांसाठी रोजची साधी कामे करणे किती कठीण असू शकते. अशा
प्रकारचे अदृश्य अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत भारत जगातील इतर
देशांच्या बाबतीत बराच अग्रेसर आहे.
हा अदृश्य समाज ध्रुव लाRा याच्या बस
प्रवासात एका बहिऱ्याची तिकीट काढण्यासारखी साधी गोष्ट करताना झालेली
घालमेल पहिल्याने नजरेत आला. परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्या या तरुणाला
समाजसेवा आणि स्वतंत्र व्यवसाय एकत्र करण्याची नामी युक्ती या प्रसंगातून
मिळाली. परंतु अशा युक्त्या बऱ्याच जणांना येतात आणि वास्तव्यात कठीण
असल्याने पटकन डब्यातही जातात. परंतु ध्रुवने आपल्या युक्तीवर अंमल आणला
आणि जन्म झाला मिरेकल कुरीअर्सचा. मिरेकल कुरीअर्स ही अशी एकमेव कुरिअर
संस्था आहेत ज्यात सगळे कर्मचारी हे बहिरे आहेत. बहिऱ्या लोकांची पाहण्याची
क्षमता ही त्यावर वाढलेल्या जबाबदारीमुळे सामान्य लोकांच्या तुलनेत अधिक
चांगली असते. आणि कुरिअर कंपन्यांमध्ये काम करणे म्हणजे मुख्यत्वे
डोळ्यांचेच काम असते. या सर्व बाबींच्या फायदा मिरेकल कुरियरला झाला आणि आज
या कुरियरचा व्याप बराच वाढला आहे.
ध्रुव लाक्रा,
संस्थापक मिरॅकल कुरिअर्स
संस्थापक मिरॅकल कुरिअर्स
येथील प्रत्येक जण अगदी दक्षतेने काम
करतो. इथे गडबड असली तरी कधीच गोंगाट ऐकायला येणार नाही. कारण देवानेच ती
व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु येथील प्रत्येक बहिरा कर्मचारी सन्मानाने
आपला व्यवसाय करू शकतो आणि समाजासाठी सेवा देण्याचा स्वत:चा रोजगार
सक्षमतेने सांभाळून स्वत:च्या पायवर उभा राहू शकतो. जी बहिऱ्यांसाठी अत्यंत
दुर्मिळ गोष्ट आहे. आज भारतात ६० लाखांपेक्षा जास्त कर्णबधिर व्यक्ती असून
पैकी पुष्कळसे बेरोजगार आहेत. आणि ज्यांच्याकडे काम आहे तेही अत्यंत
खालच्या दर्जाचे आहे. अशात मिरेकल कुरिअर्स ही कंपनी सर्व बहिऱ्यांना
रोजगार देण्याचे जे स्वप्न बाळगते ते पाहून ध्रुव आणि टीमचे प्रचंड कौतुक
वाटते. ध्रुवच्या या यशस्वी वाटचालीला राष्ट्रीय पारितोषिकासह बरेच मोठे
सन्मान मिळाले आहेत.
समाजसेवा करायची म्हणजे स्वत:चे आयुष्य
पूर्णपणे विसरून जाऊन दुस-यांसाठीच काम करणे या समजुतीला ध्रुवने अत्यंत
हुशारीने तडा दिलाय. नुसता सन्मान न देता स्वबळावर उभ्या असलेल्या या
कर्णबधिरांना ध्रुवने स्वाभिमानही मिळवून दिला आहे, तोही एक स्वतंत्र आणि
सतत वाढता असा यशस्वी व्यवसाय उभारून. मिरेकल कुरिअर्ससारखा चमत्कार समाजात
क्वचितच आढळून येतो. तो जास्तीत जास्त टिकवण्यासाठी आपण सर्वानी मिळून
त्यास हातभार लावला पाहिजे. तर यापुढे कुरिअर करण्याआधी आपल्या आसपास
मिरेकल कुरिअरची एखादी शाखा आहे का हे नक्की पडताळून पाहा. नसेल तरी ती
भविष्यात नक्की येईल याची खात्री ध्रुवचे चालेंज पाहून होते. काय आहे हे
ध्रुवचे स्वत:ला घातलेले चालेंज?. पाहण्याकरता पुढील वेब-साइटला नक्की भेट
द्या.
२० हजारांचे ते ५० हजार कोटी बनवणारा सुनील मित्तल
हल्लीची तरुण मुलं आई
वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८
वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर
व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने
सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल "
नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमद्धे एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोने अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले कि त्याने ते आपल्या देशात नेउन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोने आयात करण्यावर बंदी होति. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्याच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने हि कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मद्धे देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमद्धे सुरु केलीआणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्सुअरन्स, औषध क्षेत्रातहि कार्यरत आहे. २००७ मद्धे सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव केला.
मित्रानो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहित. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमद्धे असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ? कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामद्धे मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाहि. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आआवश्यकता नाही.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमद्धे एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोने अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले कि त्याने ते आपल्या देशात नेउन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोने आयात करण्यावर बंदी होति. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्याच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने हि कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मद्धे देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमद्धे सुरु केलीआणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्सुअरन्स, औषध क्षेत्रातहि कार्यरत आहे. २००७ मद्धे सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव केला.
मित्रानो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहित. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमद्धे असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ? कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामद्धे मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाहि. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आआवश्यकता नाही.
खूपच साँलेट
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवामला प्लास्टिकच्या गोण्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन द्यावे. ही विनंती.
उत्तर द्याहटवाSir mala mudra lone sathi application dyaych ahe pn bank lone det nahi 1 lakh rupya paryant online application kel hot pn mala 10 lakh rupya paryant lone pahijet majhyakde dudh utpadan udyoga cha project report ready ahe mala lone milanya sathi krupya madat kara.
उत्तर द्याहटवा