मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यवसायासाठी मुद्रा बँक ठरतेय नवसंजीवनी

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी तसेच देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा; यासाठी ८ एप्रिल २०१५ रोजी, २०००० करोड रुपये भांडवल असलेली ह्यमायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ही बँक नसून अर्थपुरवठा करणारी संस्था आहे व याला कंपनीचे स्वरूप देण्यात आले आहे. भविष्यात हिला बँकेचे स्वरूप येईल, म्हणून मुद्रा बँक या नावानेही या संस्थेला ओळखले जाईल. व्यवसाय करायचा किंवा करताहेत मात्र पैसा नाही, भांडवल नाही़ अशासाठी शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली़ त्यामुळे नो टेन्शऩ़क़ागदपत्र गोळा करा़़़अन् तत्काळ बँक गाठा़़़़आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवा मुद्रा बैंक आणि त्याची माहिती मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शिशू श्रेणी अंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे. तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. तसेच तरुण श्रेणी अंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. मुद्रा बँकेद्वा...