
मुद्रा बैंक आणि त्याची माहिती

भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाईल. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्??र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करेल. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करेल. तसेच व्याजाचा दरही कमी असणार आहे. तुमचे कर्ज मंजूर झाले की त्यानंतर तुम्हांला ह्लमुद्रा कार्डह्व दिले जाईल, जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.
मुद्रा बँकेची वैशिष्ट्ये-
1. देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य.
वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा.
2. २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ आणि ३००० कोटींची क्रेडीट गारंटी असलेली सिडबीची ही उपकंपनी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणार.
3. सूक्ष्म वित्त संस्थे व्यतिरिक्त मुद्रा बँके करिता स्वतंत्र विधेयक.
मुद्रा लोन साठी लागणारी माहिती खालील प्रमाणे-
1. कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
2. कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही.
3. हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
4. वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठीची कागदपत्रे खालील प्रमाणे-
1. ओळखीचा पुरावा झ्र मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
2. रहिवासी पुरावा उदा झ्र लाईट बिल, घर पावती.
3. आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
4. व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
5. आपण ज्या व्यापा?्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
6. अर्जदाराचे 2 फोटो.
मुद्रा बँकेतून कर्ज घेणाºया लोकांसाठी महत्वाची माहिती-
1. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
2. कोणतीही सरकारी बँक हे कर्ज नाकारू शकत नाही.
3. स्वत:चे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा