मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल्स’अन् ‘बेरोजगारीवर’ उपचार

मित्रांनो जगात अस कुठलेही काम नाही ते अशक्य आहे. फक्त आपला तसा दृष्टीकोन असला पाहिजे. ते म्हणतात जशी दृष्टी तशी सृष्टी बस अगदी याप्रमाणे... जर आपण बेरोजगार असाल, व कमी भांडवलात जास्तीचे पैसे मिळतील, असा कुठला व्यवसाय करावा, या विवंचनेत असाल, अशा तरुण, नागरिकांनी हा माझा लेख काळजीपूर्वक व जरुर वाचावा...  आयुष्यात आपण सर्वांना अनेक गोष्टी डोळ्यांनी दिसतात. मात्र त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो. ते पाहणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. कधी कधी आपण पाहतो, मात्र तरीही आपल्या नजरेस काही महत्वाच्या गोष्टी पडत नाही. अनेकदा आपण अनेकांच्या तोंडून एैकल असेल...अरे यार हे मला लक्षातच आल नाही...हा विचार तर मी केलाच नाही... एवढी मोठी गोष्ट माझ्या लक्षात आलीच नाही...हो होत अस अनेकदा. अगदी याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी मोठे मोठे दवाखाने बघतो, या दवाखान्यांकडे आपण फक्त उपचाराच्या, तेथील सवलती, सोयीसुविधा, डॉक्टर किंवा भली मोठी व पॉश इमारत या दृृष्टीकोनातून बघतो. एवढे मोठे हॉस्पिटल्स उभा करणारा हा डॉक्टर महिन्याला रग्गड पैसे कमवित असेल, याचाही आपण विचार करतो, व याच विचारात आपण आपली उर्जा...