मित्रांनो जगात अस कुठलेही काम नाही ते अशक्य आहे. फक्त आपला तसा दृष्टीकोन असला पाहिजे. ते म्हणतात जशी दृष्टी तशी सृष्टी बस अगदी याप्रमाणे... जर आपण बेरोजगार असाल, व कमी भांडवलात जास्तीचे पैसे मिळतील, असा कुठला व्यवसाय करावा, या विवंचनेत असाल, अशा तरुण, नागरिकांनी हा माझा लेख काळजीपूर्वक व जरुर वाचावा...
आयुष्यात आपण सर्वांना अनेक गोष्टी डोळ्यांनी दिसतात. मात्र त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो. ते पाहणार्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. कधी कधी आपण पाहतो, मात्र तरीही आपल्या नजरेस काही महत्वाच्या गोष्टी पडत नाही. अनेकदा आपण अनेकांच्या तोंडून एैकल असेल...अरे यार हे मला लक्षातच आल नाही...हा विचार तर मी केलाच नाही... एवढी मोठी गोष्ट माझ्या लक्षात आलीच नाही...हो होत अस अनेकदा. अगदी याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी मोठे मोठे दवाखाने बघतो, या दवाखान्यांकडे आपण फक्त उपचाराच्या, तेथील सवलती, सोयीसुविधा, डॉक्टर किंवा भली मोठी व पॉश इमारत या दृृष्टीकोनातून बघतो. एवढे मोठे हॉस्पिटल्स उभा करणारा हा डॉक्टर महिन्याला रग्गड पैसे कमवित असेल, याचाही आपण विचार करतो, व याच विचारात आपण आपली उर्जा वाया घालवितो. कदाचित यामुळे ते आपल्याला लक्षातही राहते. मात्र आपण कधी अशा मोठ मोठ्या मल्टीस्पेशालीटी हॉस्टिपल्स, दवाखानेही आपल्यालाही मोठ्ठ बनवू शकतात, याबाबत कधी विचार केला आहे? तर या प्रश्नाच उत्तर अनेकांकडून नाही असच येईल.
प्रत्येक शहर, तालुक्यांप्रमाणे आता तर अगदी छोट...छोट्या खेड्याच्या ठिकाणीही रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून मोठ- मोठे हॉस्पिटल्स उभे राहू लागले आहे. काही ठिकाणी तीन ते चार बेड असतात, तर काही किमान 20 ते 25 खाटांचे रुग्णालय असतात. या रुग्णालय तसेच येथील रुग्ण तसेच त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईक, त्यांना काय हवे, काय नको हा विचार करुन व्यवसायाची आखणी केली तरी, मला वाटत आपणही मोठ्ठ होवू. प्रश्न पडला असेल तुम्हाला कसला, व्यवसाय, व्यवसायाची आणखी कशी, नाही कळल ना? चला तर तुम्हाला मी अनुभवलेला किस्सा सांगतो. ते अनुभवण्यापूर्वी मीही तुम्हा सर्वांसारखी या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती.
अचानकपणे काम करत असतांना मला बे्रनस्ट्रोक पडला. त्यातून मायनर पॅरॉलिसीस या आजाराला मला सामोरे जावे लागले होते. यासाठी शहराबाहेरील एका मोठ्या रुग्णालयात मला महिनाभर उपचारासाठी दाखल व्हावे लागले. या रुग्णालयात किमान चारशे ते पाचशे किंवा त्यापेक्षाही जास्त रुग्ण दाखल असतात. व त्यांच्यावर उपचार केले जातात. चोवीस वेगवेगळे डॉक्टर, गणवेशातील पारिचारिका, 24 तास औषधी अन् इंजेक्शन असेच काही रुग्णालयाचे वातावरण. एकेदिवशी मी सकाळी उठलो. माझी नजर पडली ती माझ्या वार्डात चहा चहा करत आलेल्या चहावाल्या मुलावर. सकाळ असल्याने रुग्ण आणि रुग्णसोबतच मुक्कामी नातेवाईक सर्व जण चहावाल्याची आतुरतेने वाट पहात बसले होेते. तो आला प्रत्येकाला चहा देत, ज्याला चहा दिली, त्याच्याकडून पैसेही घेतले. सोबत बिस्टकीटचा पुडाही होता. त्याला बघून माझा बिझनेस माईंड जागृत झाला, आणि अनेक प्रश्नांनी मला भंडावून सोडले. दुसर्या दिवशी या चहावाल्याला मी प्रश्न केला की, दिवसभरात तु अंदाजे किती चहा विकत असशील, ज्याने जे उत्तर दिले ते एैकून मी शॉकच झालो. त्याचे उत्तर होते. 1 हजार किंवा त्यापेक्षा जास्त. म्हणजे 7 रुपये प्रमाणे एक हजार चहा सात हजार रुपये रोज.. त्यात खर्च वजा जाता 5 हजार रुपये रोज म्हणजे नुसता चहा विकला तरी दर महिन्याला एक लाख 50 हजार म्हणजे एक क्लासवन अधिकार्याच्या पगारापेक्षाही दुप्पट पैसे.. ,
या अनुभवामुळे रुग्णालयात चहा प्रमाणे आणखी काय व्यवसाय करता येईल, असा विचार केला. यात रुग्ण हा आपल्या गावापासून दूर आलेला असतो, काहींचे नातेवाईक असतात, काहींचे नसतात, त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यानुसार जेवण, एक रुग्ण म्हटला की त्याच्यासोबत मुक्कामी दोन जण असतातच. रुग्ण किमान दहा ते 15 दिवस दाखल असतो. दहा दिवसांपर्यंत त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना जेवणाचा डबा आणून देता येईल. 50 रुपये डबा पकडला तरी 200 एका दिवसाचे दहा दिवसाचे 2 हजार रुपये. एका रुग्णाचे 2 हजार, असे दहा रुग्ण धरले तरी 2 हजार रुपये रोज, दहा दिवसांचे वीस हजार रुपये, याप्रमाणे खर्च वजा जाता किमान 50 हजार रुपये महिना घरबसल्या कमवू शकतो. फक्त जेवण काय पाहिजे, त्यानुसार ते तयार करुन ते पोहचवून देणे. याबरोबरच उकळलेले अंडेही रुग्णांना देता येवू शकतात. रोज 100 अंडे जरी विकले तरी 10 रुपये प्रमाणे हजार रुपये रोज, तीस हजार रुपये महिना आपण कमवू शकतो.
अशा प्रकारे आपल्या परिसरात छोटे मोठे दवाखाने असतील. मी सांगितलेल्यानुसार चहा, अंडे, जेवणाचे डबे या व्यतिरिक्तही आणखीही काही सुविधा पुरवता येतील. त्यातून आपण दोन पैसे नव्हे तर भरपूर पैसे कमवू शकतो. हे वाचल्यानंतर अनेक जण म्हणतील की अरे हे तर मला सुचलच नाही. कळत प्रत्येकाला फक्त वळत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला खूप मोठ्ठ बनवू शकतात. त्यामुळे छोटे मोठे दवाखानेही रुग्णांप्रमाणेच बेरोजगारीवर उपचार शकतात. त्यासाठी केवठ जिद्द, संयम व चिकाटी गरजेची आहे. तर चला मग विचार कसला करता आहे, लागा कामाला....
(मित्रांनो माझा ब्लॉगला भेट देणार्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे. मी सांगितल्यानुसार आपण जर आपल्या व्यवसायाची सुरुवात करत असाल, व त्यासाठी कुठलेही मार्गदर्शन लागत असले, तर नक्की संपर्क करा. 9209978085. आणि लेख कसा वाटला हे कमेंट कराला विसरु नका...धन्यवाद)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा