मुख्य सामग्रीवर वगळा

व्यवसायासाठी मुद्रा बँक ठरतेय नवसंजीवनी

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी तसेच देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा; यासाठी ८ एप्रिल २०१५ रोजी, २०००० करोड रुपये भांडवल असलेली ह्यमायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ही बँक नसून अर्थपुरवठा करणारी संस्था आहे व याला कंपनीचे स्वरूप देण्यात आले आहे. भविष्यात हिला बँकेचे स्वरूप येईल, म्हणून मुद्रा बँक या नावानेही या संस्थेला ओळखले जाईल. व्यवसाय करायचा किंवा करताहेत मात्र पैसा नाही, भांडवल नाही़ अशासाठी शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली़ त्यामुळे नो टेन्शऩ़क़ागदपत्र गोळा करा़़़अन् तत्काळ बँक गाठा़़़़आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवा

मुद्रा बैंक आणि त्याची माहिती
मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शिशू श्रेणी अंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे. तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. तसेच तरुण श्रेणी अंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर
भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाईल. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्??र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करेल. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करेल. तसेच व्याजाचा दरही कमी असणार आहे. तुमचे कर्ज मंजूर झाले की त्यानंतर तुम्हांला ह्लमुद्रा कार्डह्व दिले जाईल, जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

मुद्रा बँकेची वैशिष्ट्ये-
1. देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य.
वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा.
2. २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ आणि ३००० कोटींची क्रेडीट गारंटी असलेली सिडबीची ही उपकंपनी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणार.
3. सूक्ष्म वित्त संस्थे व्यतिरिक्त मुद्रा बँके करिता स्वतंत्र विधेयक.

मुद्रा लोन साठी लागणारी माहिती खालील प्रमाणे-
1. कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
2. कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही.
3. हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
4. वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठीची कागदपत्रे खालील प्रमाणे-
1. ओळखीचा पुरावा झ्र मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
2. रहिवासी पुरावा उदा झ्र लाईट बिल, घर पावती.
3. आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
4. व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
5. आपण ज्या व्यापा?्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
6. अर्जदाराचे 2 फोटो.
मुद्रा बँकेतून कर्ज घेणाºया लोकांसाठी महत्वाची माहिती-
1. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
2. कोणतीही सरकारी बँक हे कर्ज नाकारू शकत नाही.
3. स्वत:चे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती . व्यवसायाला सुरुवात करताना व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.  व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –  आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात ...

आपले हात आणि बुध्दी तर लॉकडाऊन झाले नाही ना....

कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे. एक एक देश कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे मात्र वेगाने त्याचा फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाने जोरदार धडक दिली. कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या कोरोनामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच लॉकडाऊन झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने आपल्या आहे त्या ठिकाणच्या रोजगारावर कुर्‍हाड कोसळते की काय? लॉकडाऊनमुळे आपला रोजगारच लॉकडाऊन तर नाही होणार ना? अशी भिती अनेकांमध्ये भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आहे. मात्र मित्रांना घाबरु नका, कंपनी, संस्था, आपला रोजगार लॉकडाऊन केला तरी आपली हात व बुध्दी तर लॉकडाऊन नाही करणार ना! त्यामुळे भिती कसली, मेरा हात जगन्नाथ याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. चिंता करण्यात आपली उर्जा वाया न घालविता. नवीन काय करता येईल की ज्यातून आपल्याला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, हा विचार करण्यात इनर्जी खर्च करा. तर करा मग विचार करायला सुरुवात... मी आहेच तुमच्या सोबतीला. गेल्या काही दिवसांपासून आपण घरातच आहोत. अनेक जणांचे पगार झाले तर. अने...

उद्योगमित्र

मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही . मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोक...