मुख्य सामग्रीवर वगळा

मी पुन्हा आलोय.....



गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण सर्वांपासून दूर होतो. आजारापण, खाजगी अडचणी त्यामुळे लिहिण्यात खंड पडला व त्यामुळे तुमच्यासाठी कुठलीही उपयुक्त ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करतो. दरम्यानच्या काळात मित्र, मैत्रिणी, नागरिक आणि महिलांनी आपण सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देवून आपली प्रतिक्रिया दिली. आपण दाखविलेल्या प्रेमामुळे आपण सर्वांच्या आभारी आहे. याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या प्रतिक्रियामुळे व आपण दाखविलेल्या प्रेमामुळे मी पुढील आयुष्यात आणखी चांगले, आणि दर्जेदार विषय तुमच्या पोहचविण्यासाठी मला निश्‍चित उर्जा मिळणार आहे. तरी आपणा सर्वांच्या भेटीला पुन्हा आलोय.
                                                                                                                     आपलाच किशोर पाटील.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती . व्यवसायाला सुरुवात करताना व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.  व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –  आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात ...

आपले हात आणि बुध्दी तर लॉकडाऊन झाले नाही ना....

कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे. एक एक देश कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे मात्र वेगाने त्याचा फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाने जोरदार धडक दिली. कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या कोरोनामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच लॉकडाऊन झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने आपल्या आहे त्या ठिकाणच्या रोजगारावर कुर्‍हाड कोसळते की काय? लॉकडाऊनमुळे आपला रोजगारच लॉकडाऊन तर नाही होणार ना? अशी भिती अनेकांमध्ये भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आहे. मात्र मित्रांना घाबरु नका, कंपनी, संस्था, आपला रोजगार लॉकडाऊन केला तरी आपली हात व बुध्दी तर लॉकडाऊन नाही करणार ना! त्यामुळे भिती कसली, मेरा हात जगन्नाथ याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. चिंता करण्यात आपली उर्जा वाया न घालविता. नवीन काय करता येईल की ज्यातून आपल्याला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, हा विचार करण्यात इनर्जी खर्च करा. तर करा मग विचार करायला सुरुवात... मी आहेच तुमच्या सोबतीला. गेल्या काही दिवसांपासून आपण घरातच आहोत. अनेक जणांचे पगार झाले तर. अने...

उद्योगमित्र

मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही . मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोक...