आपण सर्वांना हे माहिती असलेच, आजच्या काळात सोशल मिडीया म्हणजे गल्लीपासून ते सातासमुद्रापार माहिती पोहचविण्याचे अगदी वेगवान माध्यम झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून काही मिनिटात, सेंकदात हवी ती माहिती हव्या त्या अगदी म्हणजे जगाच्या कानाकोपर्यात पोहचू शकतो. आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. याच माध्यमातून 15 डिसेंबर हा जागतिक चहा दिवस असल्याचे समजले. जागतिक चहा दिवस म्हणजे काय, तो कशामुळे व पहिल्यांदा कधी साजरा झाला. याबाबत मला माहिती नाही. मात्र याच चहामुळे अनेक जण कोट्यधीश झाले याबाबत मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. सांगायच झालच तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चहावाला म्हणून जगभरात ओळख आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर अनेक चहा विक्रेत्यांना व्यवसायाचा अभिमान वाटला नसेत तर नवलचं. भारतवासियांच्या दृष्टीने जर इंग्रज भारत सोडून जातांना कोणती गोष्ट चांगली सोडून गेली असतील तर ती म्हणजे चहा. अशा जागतिक चहा दिनाच्या सुरुवातीला आपणास सर्वांना शुभेच्छा... आपण आयुष्यभर नोकरी, त्यात वाढलेली स्पर्धा, नोकरी टिकविण्यासाठीचे कष्ट, त्या...