मुख्य सामग्रीवर वगळा

मी पुन्हा आलोय.....



गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण सर्वांपासून दूर होतो. आजारापण, खाजगी अडचणी त्यामुळे लिहिण्यात खंड पडला व त्यामुळे तुमच्यासाठी कुठलीही उपयुक्त ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करतो. दरम्यानच्या काळात मित्र, मैत्रिणी, नागरिक आणि महिलांनी आपण सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देवून आपली प्रतिक्रिया दिली. आपण दाखविलेल्या प्रेमामुळे आपण सर्वांच्या आभारी आहे. याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या प्रतिक्रियामुळे व आपण दाखविलेल्या प्रेमामुळे मी पुढील आयुष्यात आणखी चांगले, आणि दर्जेदार विषय तुमच्या पोहचविण्यासाठी मला निश्‍चित उर्जा मिळणार आहे. तरी आपणा सर्वांच्या भेटीला पुन्हा आलोय.
                                                                                                                     आपलाच किशोर पाटील.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती . व्यवसायाला सुरुवात करताना व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.  व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –  आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात ...

हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।

 हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………। मि त्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे ,  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात  अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच ,  फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि  मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि  केली  मा...

उद्योगमित्र

मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही . मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोक...