आपण सर्वांना हे माहिती असलेच, आजच्या काळात सोशल मिडीया म्हणजे गल्लीपासून ते सातासमुद्रापार माहिती पोहचविण्याचे अगदी वेगवान माध्यम झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून काही मिनिटात, सेंकदात हवी ती माहिती हव्या त्या अगदी म्हणजे जगाच्या कानाकोपर्यात पोहचू शकतो. आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. याच माध्यमातून 15 डिसेंबर हा जागतिक चहा दिवस असल्याचे समजले. जागतिक चहा दिवस म्हणजे काय, तो कशामुळे व पहिल्यांदा कधी साजरा झाला. याबाबत मला माहिती नाही. मात्र याच चहामुळे अनेक जण कोट्यधीश झाले याबाबत मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. सांगायच झालच तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चहावाला म्हणून जगभरात ओळख आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर अनेक चहा विक्रेत्यांना व्यवसायाचा अभिमान वाटला नसेत तर नवलचं. भारतवासियांच्या दृष्टीने जर इंग्रज भारत सोडून जातांना कोणती गोष्ट चांगली सोडून गेली असतील तर ती म्हणजे चहा. अशा जागतिक चहा दिनाच्या सुरुवातीला आपणास सर्वांना शुभेच्छा...
आपण आयुष्यभर नोकरी, त्यात वाढलेली स्पर्धा, नोकरी टिकविण्यासाठीचे कष्ट, त्यामुळे मिळणारे पैसे.. त्यामुळे आपली पूर्ण स्वप्न..हा विचार केला तर आपल आयुष्य नोकरी करत अस स्वप्न पूर्ण न करता, इच्छा आकांशा मारुन निघून जातो. शेवटी कुणाला तरी मोठे झालेले बघितल की मग आपल्याला सुचत की मी सुध्दा ते करु शकलो. करु शकलो असता म्हणजे माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपण सर्व करु शकतो. फक्त त्यासाठी लागते जिद्द...
आपणास माहिती नसेल की चहा विकून आपण कोट्यधीश बनू शकतो. वाचून धक्का बसला ना... पण हे अगदी खर आहे. मी जे सांगतो त्यावर माझाही विश्वास बसत नव्हता. मात्र भारत देशात जेवढे चहाचे लोक दिवाने आहेत तेवढे इतर कुठल्याही देशात नाही. मित्रांना चहा बनिवले ही एक कला असली तर ती अशक्य मात्र नाही. आज असा कुणीही नसेल की ज्याला चहा बनविता येत नसेल. आज तुम्हाला जागतिक चहा दिनाचे औचित्य साधून हा चहा बनवून विकण्याचा व्यवसाय तुम्हाला कशा पध्दतीने कोट्यधीश बनवू शकतो याबाबत माहिती सांगणार आहे.
चहासाठी भांडवल अंत्यत कमी लागते. चहा बनविण्यासाठी भांडे,चहा पावडर, गॅस, चहा देण्यासाठी कप अथवा ग्लास, आणि लोडगाडी... चहा करायचा प्रत्येकाचा वेगवेगळा फॉर्म्युला असतो. अंत्यंत मोक्याची जागा शोधून लोडगाडी लावा, अथवा दुकान घेवूनही आपल्या व्यवसाय करता येईल. आपण बनवित असलेल्या चहाची खर्चानुसार किंमत ठरवू शकतो. आपण आपल्या पध्दतीने चहाचा फार्म्युला ठरवा. तो सर्वांना आवडला तर. तो कायम ठेवून त्यानुसार चहा विक्री करा. सुरुवातीला नवीन असल्याने कमी ग्राहक आपल्याकडे आकर्षित होती. मात्र कालांतर आपली चहाची चव कायम राहिली. ती कायमची ग्राहक होवून जातील. जसजशी आपल्याकडे ग्राहक वाढतील त्यापध्दतीने आपण दुकानावर येणार्या ग्राहकाव्यतिरिक्त परिसरातील दुकानदार ऑफिस, कार्यालयांमध्येही आपण आपला चहा पोहचविण्याची व्यवस्था करा, फोन करा आणि चहा यापध्दतीने प्रत्येकाच्या मोठमोठे कार्यालये, ऑफिस याठिकाणी आपले माहिती असलेले पॉम्लेट वाटा अथवा चिकटवा. अशा पध्दतीने आपला व्यवसाय वाढवा.
आता व्यवसाय तुम्हाला कसे पैसे मिळवून देतो, हे सांगितले तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आपण विकत असलेल्या चहा किंमत सात रुपये अशी आहे. सुरुवातीला आपण दिवसभरात 50 चहा विकत असाल. 50*7 = 350 रुपये रोज
महिन्याचे 350*30 = 10 हजार 500 रुपये. म्हणजे काही ठिकाणी आठ तास किंवा बारा तास काम केल्यावर मिळणार पगार. याठिकाणी तुम्हीच मालक आहात. सुरुवातीला खर्च वजा जाता कमी पैसे मिळतील. यानंतर दिवसभरात 500 चहा विक्रीचे उद्दीष्ट डोक्यासमोर ठेवा. दुकानावर येणारे ग्राहक + परिसरातील हॉस्पिटल, दुकाने, कार्यालये, असे सर्व मिळून दिवसात 500 चहा विक्रीचे उद्दीष्ट पूर्ण करणे अवघड नाही. 500*7 =3500 रुपये रोज. 3500*30=105000 महिन्याचे यातून कामाला लावलेला माणूस, खर्च जर 15 हजार रुपये पकडला. तरी 90 हजार रुपये आपण नफा कमविणार आहोत. म्हणजे एखाद्या वर्ग 1 च्या अधिकार्याला 12 तास काम करुन मिळणारा पगार. मात्र या ठिकाणी तुम्ही तुमचे मालक आहात. केव्हाही या केव्हाही सुट्टी घ्या. आता मी फक्त 500 चहा विक्रीचे उद्दीष्ट सांगितले. जसा जसा व्यवसाय तुम्हाला पैसा मिळवून त्यानुसार तुम्हाला चहाचे नवनवीन प्रकार ठेवता येतील, जसे की ब्लॅक टी, लेमन टी, कॉफी, गवती चहा, तुळशीचे पत्ते, काळी मिरी असलेला आयुर्वेदीक काढा, या पध्दतीने तुम्ही अनेक प्रकाराची चहा विक्री करुन आपली ओळख बनवू शकतात. एकदाची ओळख बनली की, आपण आपले अनेक ठिकाणी आले आऊटलेट उघडू शकतात. तसेच मोठ मोठ संत्संगच्या कार्यक्रम, साखरपुडा, पक्षाच्या बैठका, अधिकार्याच्या बैठका, मोठे महोत्सव याठिकाणी आपली चहा गाडी लावून त्याठिकाणी एक माणुस नियुक्त करुन चहा विक्री करु शकतात. विशेष म्हणजे चहाला सिझन नाही. बाराही वर्ष बाराही महिने लोक चहा पितात. त्यामुळे बाराही महिने तुम्हाला पैस मिळवून देणारा असा हा बिझनेस आहे. फक्त मनातील न्युनगंड दूर करुन परिश्रम करण्याची तयारी ठेवा. मग तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
पुण्यात येवले, अमृततृल्य ही चहा विकून कोट्यधीश झालेल्या लोकांची उदाहरणे आपल्याला माहिती असतीलच.. तर चला विचार काय करता लागा कामाला.....
आपण युट्युबच्या माध्यमातून चहा विकून कोट्यधीश झालेल्यांचे व्हिडीओ बघितले की, आपल्याला विश्वास बसेल.
त्यासाठी मी स्वतःहून तुम्हाला काही लिंक शेअर करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा