कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. एक एक देश कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे मात्र वेगाने त्याचा फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाने जोरदार धडक दिली. कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या कोरोनामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच लॉकडाऊन झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने आपल्या आहे त्या ठिकाणच्या रोजगारावर कुर्हाड कोसळते की काय? लॉकडाऊनमुळे आपला रोजगारच लॉकडाऊन तर नाही होणार ना? अशी भिती अनेकांमध्ये भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आहे. मात्र मित्रांना घाबरु नका, कंपनी, संस्था, आपला रोजगार लॉकडाऊन केला तरी आपली हात व बुध्दी तर लॉकडाऊन नाही करणार ना! त्यामुळे भिती कसली, मेरा हात जगन्नाथ याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. चिंता करण्यात आपली उर्जा वाया न घालविता. नवीन काय करता येईल की ज्यातून आपल्याला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, हा विचार करण्यात इनर्जी खर्च करा. तर करा मग विचार करायला सुरुवात... मी आहेच तुमच्या सोबतीला.
गेल्या काही दिवसांपासून आपण घरातच आहोत. अनेक जणांचे पगार झाले तर. अनेकांना कमी दिवसांचा पगार मिळाला. तर काहींना मिळालाच नाही. यानंतर कंपनी बंद असल्याने घरी असलेल्यांपैकी काहींनाच पगार मिळेल अशी शक्यता आहे. थोडक्यात आहे त्या पैशांमध्ये लॉकडाऊनचा काळ सर्वांना पार पाडायचा आहे. यानंतर रोजगारावर गदा आली तर...त्यामुळे आपल्या दुसरा पर्याय असायला हवा. कारण पैसा भगवान तो नही लेकीन भगवान से कमी नाही. याप्रमाणे आजच्या काळात जगण्यासाठी पैसा आवश्यक आहेत. अनेक जणांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे अशांचा रोजगार गेला तर पूर्ण कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे काय? हा प्रश्नही बहुतेक जणांना सतावत असणार... पण चिंता करुन उपयोग नाही.. आणि ते कुणीतरी म्हटले आहे ना! की ‘चिंता चिता के समान’ है. त्यामुळे चिंता करुन उपयोग नाही. ऐन वेळी उद्या आपल्याला कळविण्यात येईल की आपण रोजगार गेला. तर त्यादिवसाची वाट पाहू नका. चिंता करण्यापेक्षा आजपासून पुढे काय करायचे हा विचार करा...
आता तुम्ही म्हणाल की, पर्याय काय निवडायचा आणि जर काही धंदा करावयाचा असेल तर त्यासाठी पैसा कुठून आणायचा? तर हा प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे मी आधीच म्हटल की प्रत्येकाने विचार करा. विचार करा म्हणजे. प्रत्येकाने कागदावर आपल्याला सुचत असणार्या आयडीया लिहा. यात कोणता व्यवसाय आपण करु शकतो? त्याची वेगळी लिस्ट तयार करा. या लिस्टमधील कोणत्या व्यवसायासाठी आपल्या किती भांडवल लागेल? आपल्याकडे तेवढे भांडवल अथवा पैसे आहेत काय? संपूर्ण भांडवल लावल्यानंतर व्यवसायातून पैसे किती व कसे मिळतील? हे सुध्दा लिहा. कागदावर यासाठी लिहायला सांगतो आहे की, एखादी गोष्ट आठवली की आपण लगेच विसरतो सुध्दा. कागदावर घेतलेली प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहिल यापेक्षा ती समोर राहिल. हे करत असतांना आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी स्पष्ट चर्चा करा. ते सुध्दा आपल्याला मदत करतील. कारण प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात.
ऑनलाईन डिलेव्हरी कंपन्यांचे महत्व वाढणार
कोरोना आणि लॉकडाऊननेे जगाला खुप सार्या गोष्टी शिकविल्या आहेत. यात काय करावे व काय करु नये अशा गोष्टीची लांबलचक यादी तयार होईल. भविष्यात गर्दी टाळण्यासाठी लोक ऑनलाईन वस्तु मागवतील. त्यादृष्टीने आपल ऑनलाईन डिलेव्हरीची सुविधा देणार्या कंपन्यांचे महत्व लॉकडाऊन नंतर वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आप-आपल्या शहरात आपण असलेल्या भांडवलानुसार एखादी ऑनलाईन सेवा देणारी ऑनलाईन कंपनी अथवा व्यवसाय उघडता येईल. व आपली खाद्यपदार्थ किंवा वस्तू ऑनलाईन डिलेव्हरीच्या माध्यमातून घरोघर पोहचला येईल. तर दुसरीकडे भांडवल नसेल तर आपण आपली वस्तू संबंधित ऑनलाईन डिलेव्हरीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो. कारण ग्राहक आपल्या दुकानापर्यंत येईल, यांची शक्यता फार कमी राहणार आहे. त्यामुळे थेट त्याच्यापर्यंत कुठली वस्तू कशी पोहचले त्या कंपनीला व वस्तूला तो प्राधान्य देणार आहे.
प्रशिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहा
प्रशिक्षण घेतले की स्वतःचा व्यवसाय प्रत्येक जण करु शकतो. त्यामुळे नोकरीच्या भरवशावर अवलंबून न राहता, खाद्यपदार्थ बनविणे, ड्रेस मेकिंग, यासह सुतार यासह इतर कामांचे प्रशिक्षण घ्यावे. कारण यात प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करता येता, दुसरे असेकी अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. स्वतः आपण कुठल्या गोष्टीबाबत प्रशिक्षित असाल तर शासनाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरु करुन इतरांना प्रशिक्षण देवू शकतो. कारण प्रशिक्षण घेणार्यांची संख्या वाढल्याने आपोआपच प्रशिक्षण केंद्रही तयार होती. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राना शासन प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अनुदान हे देते. त्यामुळे हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहेत.
याबाबत प्रत्येक जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार विभागात अधिक माहिती मिळू शकते.
प्रत्येकाने दूरदृष्टी ठेवून काळाची गरज ओळखा व त्यानुसार विचार करायला शिका. सोच बदलो..देश बदलो याप्रमाणे काळानुरुप स्वतःच्या व्यवसायात किंवा स्वतःत बदल करणे गरजेचे आहे...बस एवढेच
धन्यवाद
*लॉकडाऊनच्या काळात स्टार्टअपच्या संधी... राहुल नार्वेकरांसोबत ऑनलाईन गप्पा...*
करोनामुळे सर्व विद्यापीठे लॉकडाऊन आहेत. परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचीप्रवेश प्रक्रिया आदी सर्वच अधांतरी असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्य टांगणीला लागले आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मिळणारी प्लेसमेंट नाही आणि त्यामुळे चांगल्या नोकरीचे स्वप्नही करोनामुळे अपूर्ण राहणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते असल्याने हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. याकरीता दैनिक जनशक्ति जळगावच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना ‘स्टार्टअप’ बाबत मार्गदर्शन व्हावे याकरीता द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओचे सीईओ श्री. राहुल नार्वेकर यांचा खुला ऑनलाईन इंटरव्ह्यूव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा